आर्या आंबेकरच्या आईला कधी पाहिलंय? मायलेकी दिसतात अगदी सारख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:33 PM2022-07-27T12:33:21+5:302022-07-27T12:44:18+5:30

Aarya Ambekar: आर्याने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत.

उत्तम आवाज आणि तितकाच सुंदर अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारणारी लोकप्रिय गायिका, अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर.

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या प्रकाशझोतात आली. या शोमध्ये केवळ गोड आवाजामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही ती चर्चेत राहिली.

लहान वयात कलाविश्वात पदार्पण करणारी आर्या आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.

आजवर आर्याने अनेक मालिका, चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते.

आर्या सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सौंदर्यामुळे कायम चर्चेत येणारी आर्या यावेळी तिच्या आईमुळे चर्चेत येत आहे.

आर्याप्रमाणेच तिची आईदेखील सुंदर दिसत असून या दोघी मायलेकी हुबेहूब सारख्या दिसत असल्याचं पाहायला मिळतं.

आर्याची आई सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, आर्या तिच्या आईचे फोटो शेअर करत असते.

आर्या सोशल मीडियावर सक्रीय असून कायमच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

आर्याच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळते.