पार्टी लूकमध्ये अमृताने केलं बोल्ड फोटोशूट; चंद्रमुखीच्या stunning फोटोवर नवऱ्यानेही दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:14 IST2022-08-10T15:09:57+5:302022-08-10T15:14:26+5:30

Amruta khanvilkar: अलिकडेच अमृताने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील बिंधास्त अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम अभिनयामुळे अमृता कायम चर्चेत येत असते.

काही दिवसांपूर्वीच अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अमृता मुख्य भूमिकेत झळकली आहे.

चंद्रमुखी सुपरहिट ठरल्यामुळे अमृता सातत्याने चर्चेत येत आहे.

अमृता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती दररोज कोणत्या ना कोणत्या नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच अमृताने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अमृता या फोटोमध्ये बोल्ड अंदाजात दिसत असून त्यावर तिच्या नवऱ्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अमृताने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहते घायाळ झाले आहेत. त्यामुळे त्यावर कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय.

अमृताने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून कायम अमृताचा उल्लेख केला जातो.