दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:43 AM2024-02-08T10:43:44+5:302024-02-08T10:50:43+5:30

Kshitija Ghosalkar: क्षितीजाच्या या सोलो प्री-वेडिंग फोटोशूटची संकल्पना नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. प्रथमेश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत क्षितीजासोबत लग्न करणार आहे.

प्रथमेशने त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने त्याची आणि क्षितीजाची चर्चा रंगली आहे.

सध्या प्रथमेशपेक्षा नेटकरी क्षितीजाविषयी बोलत आहेत. नुकतंच तिने सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे.

साधारणपणे लग्न ठरल्यानंतर कपल्स त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट करतात. मात्र, क्षितीजाने तिच्या एकटीचं फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या क्षितीजाने सुरेख असं फोटोशूट केलं असून तिने प्रथमेशला ते सरप्राइज म्हणून दिलं आहे.

क्षितीजाने हे फोटोशूट करत प्रथमेशला एक पत्र सुद्धा लिहिलं आहे. त्यांच्या प्रेमाच्या आठवणी तिने या पत्राच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केल्या आहेत.

नदीच्या किनारी बसून क्षितीजाने हे फोटोशूट केलं असून तिची संकल्पना सगळ्यांना भलतीच आवडली आहे.

क्षितीजाने सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केल्यामुळे तिची सध्या चर्चा होतीये.

क्षितीजाने कोणताही ग्लॅमरस लूक न करता अत्यंत सोज्वळ आणि साध्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे.