भरत जाधवइतकीच शांत आणि सुस्वभावी आहे त्याची पत्नी; जाणून घ्या मिसेस जाधवविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:00 AM2022-03-31T08:00:00+5:302022-03-31T08:00:01+5:30

Bharat jadhav: भरत जाधव याच्या कुटुंबाविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी खासकरुन आज जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भरत जाधव.

उत्तम अभिनयकौशल्य आणि संवादफेक कौशल्य यांच्या जोरावर भरत जाधवने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

चित्रपट, मालिका, नाटक अशा प्रत्येक माध्यमातून त्याने प्रेक्षकांसोबत असलेला संपर्क कायम ठेवला आहे.

भरत जाधव यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.

भरत जाधव याच्या कुटुंबाविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी खासकरुन आज जाणून घेऊयात.

भरत जाधव अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहित असतो.

भरतच्या पत्नीचं नाव सरिता जाधव असं आहे. सरिता यांनी भरत जाधवला पडत्या काळात प्रचंड साथ दिली.

सरिता प्रचंड साध्या पद्धतीने राहतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात कुठेही त्या एका बड्या स्टारच्या पत्नी असल्याचा आविर्भाव दिसून येत नाही.

भरत-सरिता यांनी आरंभ आणि सुरभी ही दोन मुलंदेखील आहेत.