अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 11:50 IST2022-03-17T11:45:26+5:302022-03-17T11:50:18+5:30
Ashok saraf: थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.

मराठी कलाविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अशोक सराफ.
उत्तम अभिनयशैली, संवादफेक कौशल्य आणि प्रत्येक भूमिका जीवंत करुन ती सादर करण्याचं कसब यामुळे अशोक सराफ विशेष लोकप्रिय झाले.
बनवाबनवी, धमाल बाबल्या गणप्याची, आमच्यासारखे आम्हीच, जमलं हो जमलं असे कितीतरी चित्रपट त्यांनी हिट केले.
अशोक सराफ यांच्या प्रमाणेच त्यांची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे.
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ या अशोक सराफ यांच्या पत्नी असून या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
अलिकडेच निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई या मालिकेत झळकल्या होत्या.
थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.
अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी एक मुलगादेखील आहे.
अशोक सराफ यांच्या मुलाचं नाव अनिकेत सराफ असं आहे.
अनिकेत कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, तो अन्य एका क्षेत्रात नशीब आजमावत आहे.
सोशल मीडियावरही फारसा सक्रीय नसलेला अनिकेत प्रोफेशनल शेफ असल्याचं सांगण्यात येतं.