कलाविश्वापासून दूर आहे आरोह वेलणकरची पत्नी; स्टाइलच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर करते मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:00 AM2022-06-23T07:00:00+5:302022-06-23T07:00:00+5:30

Aroh welankar:रेगे चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आरोहचं लव्ह मॅरेज आहे. आरोहने अंकिता शिंघवी हिच्यासोबत लग्न केलं आहे.

'बिग बॉस मराठी', 'लाडाची मी लेक गं' अशा कितीतरी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर.

आरोह कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर तो व्यक्त होत असतो.

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात आरोहचा जन्म झाला. येथेच तो लहानाचा मोठा झाला.

आरोहने पुण्यातील MIT college of engg Pune मधून त्याची इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे येथेच त्याला त्याची जोडीदार सापडला.

कायम अभिनयामुळे चर्चेत येणारा आरोह यावेळी त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे.

रेगे चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आरोहचं लव्ह मॅरेज आहे. आरोहने अंकिता शिंघवी हिच्यासोबत लग्न केलं आहे.

अंकिता कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील तिच्या सौंदर्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

आरोह वरचेवर अंकितासोबतचे फोटो शेअर करत असतो. यात बऱ्याचदा त्याच्या लहान बाळाचे फोटोही तो शेअर करतो.

अंकिताला नृत्याची विशेष आवड असल्याचं म्हटलं जातं.