अजय पूरकर यांच्या घराला आहे पारंपरिकतेचा टच; पाहा त्यांच्या घराचे Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:01 IST2023-12-18T18:51:03+5:302023-12-18T19:01:15+5:30
Ajay purkar: अजय पूरकर यांचं विशाळगडाच्या पायथ्याशी एक छान टुमदार घर आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजय पूरकर. 'पावनखिंड' या सिनेमाच्या माध्यमातून अजय पूरकर यांनी तुफान लोकप्रियता मिळवली.
पावनखिंड या सिनेमात अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती.
ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं.
अजय पूरकर यांचं विशाळगडाच्या पायथ्याशी एक छान टुमदार घर आहे. अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर या घराच्या गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती.
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या घराला त्यांनी पारंपरिकतेचा टच दिला आहे.
या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची मोठी फ्रेम सुद्धा लावण्यात आली आहे.
अजय पूरकर यांच्या घरात लाकडापासून तयार केलेल्या वस्तू, फर्निचर यांच्यावर जास्त जोर देण्यात आल्याचं दिसून येतं.
पारंपरिकतेसोबतच त्यांनी मॉर्डन पद्धतीचीही सांगड या घरात घातल्याचं दिसून येतं.
घराच्या पाठीमागे मोठी शेती असून संध्याकाळी इथला नजारा पाहण्याजोगा असतो.
घरामध्ये भरपूर प्रकाश, वारा यावा, हवा खेळती रहावी यासाठी घराला मोठमोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत.
अजय पूरकर यांनी त्यांच्या नेमप्लेटसाठीही लाकडाचाच वापर केल्याचं दिसून येतं.