Makar Sankrat 2024 : मराठमोळी परमसुंदरी..! सई ताम्हणकर काळ्या साडीत दिसतेय लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:45 AM2024-01-15T11:45:11+5:302024-01-15T12:04:11+5:30

Saie Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

सई ताम्हणकर तिच्या आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच सई ताम्हणकर हिने मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये सईने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

याशिवाय सई ताम्हणकर श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सई ताम्हणकर नुकतीच मुंबईकर झाली आहे. तिने मालाड येथे अकराव्या मजल्यावर आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे.