महेश मांजरेकरांच्या लेकाने सुरु केलं हॉटेल; पाहा त्याच्या हॉटेलचे photo

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:35 PM2023-04-05T14:35:58+5:302023-04-05T14:42:27+5:30

Satya manjrekar: महेश मांजरेकरांच्या लेकाने अभिनयासह दुसऱ्या क्षेत्रातही नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे महेश मांजरेकर.

मराठीसह बॉलिवूडमध्येही महेश मांजरेकरांच्या नावाची चर्चा होत असते.

सोशल मीडियावर मांजरेकरांसोबतच त्यांच्या पत्नी, मुलांचीही चर्चा रंगताना दिसून येते.

महेश मांजरेकरांच्या लेकींनी सिनेविश्वात पदार्पण केलं असून त्यांचा लेकही कलाविश्वात नशीब आजमावत आहे.

सत्या अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत असून अन्य क्षेत्रातही त्याने पदार्पण केलं आहे.

अलिकडेच सत्याने स्वत: व्यवसाय सुरु केला आहे.

सत्याने ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) हे नवीन मालवणी हॉटेल सुरु केलं आहे.

सत्याने त्याच्या हॉटेलचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

सत्याच्या हॉटेलची खासियत म्हणजे येथे मिळणारे सुके मासे.