मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वत:चेच भन्नाट मीम्स, हसून हसून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:52 PM2022-07-17T14:52:00+5:302022-07-17T14:59:01+5:30

Prajaktta Mali Memes: स्वत:वरील मिम्स पाहून प्राजक्ताला हसू आवरेना....मानले मीमर्सचे आभार

सोशल मीडियावरचे भन्नाट मीम्स म्हणजे आणखी एक मनोरंजन. होय, हे मीम्स पाहताना अनेकांना हसू आवरत नाही. स्वत:वरचे मीम्स एन्जॉय करणारेही इथे अनेकजण आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी यापैकीच एक.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावरचे मीम्स पाहून अनेकांना हसू आवरत नाही. प्राजक्ता माळीची स्थितीही वेगळी नाही.

होय, खुद्द प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:वरचे काही भन्नाट व मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तिचे हे मीम्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

मीम्स की दुनिया...मी एकटीच का? तुम्हीही आनंद घ्या, असं कॅप्शन देत प्राजक्ताने स्वत:वरचे काही मीम्स शेअर केले आहेत. हे मीम्स चांगलेच मजेशीर आहेत.

सर्व मीम्स इतके भन्नाट आहेत की, हसून हसून पोट दुखेल. पहिलं मीम तर भन्नाट आहे. यानंतरचे अनेक मीम्सही तितकेच मजेशीर आहेत. हे मीम्स पाहून चाहतेही क्रेझी झाले आहेत.

कुणाला पहिलं मीम आवडलं आहे तर कुणाला शेवटचं. सगळीकडे तुझंच साम्राज्य, खूप आवडले सर्व मीम्स, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

सोशल मीडियावर सर्रास प्राजक्तावरचे मीम्स व्हायरल होताना दिसतात. प्राजक्ता स्वत:वरचे हे सगळे विनोद खिलाडूवृत्तीनं स्वीकारते. प्रत्येकाला खळखळून हसत दाद देते.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्या वेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.