'नजरेत तुझ्या तलवार...' लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीची पोस्ट चर्चेत, पाहा स्वानंदीचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 06:00 AM2023-04-08T06:00:00+5:302023-04-08T06:00:00+5:30

स्वानंदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

स्वानंदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.

नुकतेच तिने साडीत फोटोशूट केले आहे आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत तिने ऑरेंज रंगाची साडी परिधान केली आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.

साडीतला फोटो शेअर करत स्वानंदीने लिहिले की, तू नार सखे सुकुमार, नजरेत तुझ्या तलवार

स्वानंदीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम केले आहे.

धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

स्वानंदीचे 'रिस्पेक्ट' आणि 'मन येड्यागत झालंया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.