लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीनं ठेवलं वडिलांच्या पावलांवर पाऊल, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:34 PM2021-05-25T18:34:22+5:302021-05-25T18:48:38+5:30

स्वानंदी बेर्डे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

स्वानंदी सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे.

स्वानंदी बेर्डेने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

स्वानंदी बेर्डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

स्वानंदी बेर्डे हिने तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले.

तसेच या नाटकात तिच्यासोबत प्रिया बेर्डेदेखील आहेत.

स्वानंदी बेर्डेचे इंस्टाग्रामवर ३५ हजार ७०० फॉलोव्हर्स आहेत.