गेली ६ वर्ष जॉन अब्राहमने जेवणातील 'तो' पदार्थ खाल्लाच नाहीये, संजय खापरेंनी केला मोठा खुलासा

By देवेंद्र जाधव | Updated: July 24, 2025 12:19 IST2025-07-24T11:36:51+5:302025-07-24T12:19:48+5:30

जॉन अब्राहमच्या फिटनेसचं रहस्य मराठमोळे अभिनेते संजय खापरेंनी सर्वांना सांगितलं. रोजच्या जेवणातील हा पदार्थ जॉनने गेली अनेक वर्ष खाल्लाच नाहीये

जॉन अब्राहम हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. जॉनला आपण विविध सिनेमांतून अभिनय करताना पाहिलंय

जॉन त्याच्या फिटनेसबाबत किती जागरुक असतो, याचा खुलासा मराठमोळा अभिनेता संजय खापरेने केलाय. संजयने आदित्य टॉक्सला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

संजय खापरेंनी जॉनसोबत रॉकी हँडसम सिनेमात काम केलंय. या सिनेमात एका अॅक्शन सीन्सच्या वेळेस जॉनच्या हाताला दुखापत झाली आणि त्याचा हात सुजला

सर, आता तुम्ही वर्कआऊट कसं करणार?, असं संजय खापरेंनी त्याला विचारलं. "मी सध्या डाएट करतोय", असं जॉन म्हणाला. "सर तुम्ही भात वगैरे नाही खात? हैदराबादला शूटिंग होतं त्यामुळे रस्सम-भात वगैरे?", असं संजय खापरेंनी त्याला विचारलं

मी सहा वर्ष भात नाही खाल्लाय, असं जॉन त्यांना म्हणाला. हे ऐकताच संजय खापरे त्यांचं ताट घेऊन दुसरीकडे जेवायला गेले. त्यांना लाज वाटायाला लागली.

मग त्यांनी मैद्याची रोटी अशी ताणली आणि तोडली, चपाती तोडायलाही काही वेळ लागले. पण भाकरी त्यांनी क्रश करुन लगेच दाखवली, अशाप्रकारे भाकरी खायला पाहिजे, असं जॉनने मला सांगितलं.

उगीच नाही मोठी होत ही माणसं! त्यांचा एक रिक्षावाला मित्र आहे. तो माझ्या घरी येतो आणि टीशर्ट वगैरे हवं ते घेतो, ही माणुसकी जपणारी माणसं आहेत, असं संजय खापरे म्हणाले