सेटवर ओळख, लग्नाच्या २ वर्षात घटस्फोट, नवऱ्यावर छळाचा आरोप…; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:53 PM2023-10-19T15:53:30+5:302023-10-19T16:00:16+5:30

या अभिनेत्रीमध्ये घटस्फोटानंतर कमालीचा बदल झाला आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री स्नेहा चव्हाण तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. अनिकेत विश्वासरावसोबत लग्न केल्यानंतर २ वर्षांनी स्नेहा चव्हाणने घटस्फोट घेतला.

विशेष म्हणजे घटस्फोटानंतर या अभिनेत्रीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने लाल इश्क, सिनिअर सिटीझन, ७०२ दीक्षित अशा काही सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसंच अनेक गाजलेल्या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे.

गेल्या काही काळात स्नेहामध्ये खूप बदल झाला आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे.

स्नेहा चव्हाण हिने तिचे केस एकदम बारीक कट केले आहेत. त्यामुळे तिच्या या नव्या हेअर स्टाइलची चाहत्यांमध्ये चर्चा होतीये.

स्नेहाने २०२१ मध्ये अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचार प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात मानसिक छळ, मारहाण होत असल्याचं तिने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं.

अनिकेतपेक्षा आपण वरचढ ठरतोय म्हणून त्याने मारहाण केल्याचं तिने आरोपपत्रात म्हटलं होतं. तर, स्नेहाने पोटगी मिळावी यासाठी हा बनाव रचल्याचं अनिकेत विश्वासरावने म्हटलं होतं. त्यानंतर २ वर्षांनी २०२३ मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला.

दरम्यान, स्नेहाप्रमाणेच तिची आई राधिका चव्हाणदेखील अभिनेत्री आहे. ‘ये है चाहतें’ या मालिकेत त्या आजीची भूमिका साकारत आहेत.