एका बस स्टॉपमुळं बदललं आकाशचं नशीब; अशी झाली सोलापूरच्या पठ्ठ्याची 'सैराट'साठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 11:12 AM2024-03-21T11:12:13+5:302024-03-21T11:23:12+5:30

Akash thosar: या सिनेमानंतर आकाश अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. परंतु, त्याची सैराटमध्ये एन्ट्री कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो.

मराठी कलाविश्वात तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे सैराट. या सिनेमाच्या माध्यातून आकाश ठोसर याने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आकाशने या सिनेमात उत्तम कामगिरी केली. त्यामुळे आज त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

सैराट या सिनेमात परश्या ही भूमिका साकारुन त्याने तुफान लोकप्रियता मिळवली.

या सिनेमानंतर आकाश अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. परंतु, त्याची सैराटमध्ये एन्ट्री कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो.

त्यामुळेच सोलापूरचा मुलगा मराठी सुपरस्टार कसा झाला ते जाणून घेऊयात.

मूळचा सोलापूरचा असलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासोबतच कुस्तीचं देखील प्रशिक्षण घेत होता. परंतु, सैराटमध्ये त्याची अचानक एन्ट्री कशी काय झाली हे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

मी गावच्या बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभा होतो. त्यावेळी नागराज सरांच्या भावाने मला पाहिलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी बोलावलं. मला वाटलं ५-१० मिनिटांचा रोल असेल पण, कोणाला माहित होतं की मला सैराटमध्ये मुख्य भूमिका मिळेल, असं आकाश म्हणाला.

सैराट हा सिनेमा अवघ्या ४ कोटींमध्ये तयार झाला होता. मात्र, या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली. इतकंच नाही तर हा सिनेमा हिंदीमध्येही धडक नावाने रिलीज झाला.

सैराटनंतर आकाशने अनेक हिंदी वेबसीरिज, मराठी सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, आजही तो परश्या या नावानेच ओळखला जातो.