Fathers Day Special : मी आणि बाबा सॉलिड टीम ! मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्यांपेक्षा त्यांचे किड्स आहेत लयभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:00 AM2022-06-19T06:00:00+5:302022-06-19T06:00:02+5:30

आज तुम्ही अनेक मराठी कलाकारांना फॉलो करत असाल. पण याचसोबत तुम्ही त्यांच्या मुलांनाही फॉलो करता. सोशल मीडियावर या स्टारकिड्स जास्त बोलबाला आहे आणि म्हणूनच आज आपण फादर्स डे निमित्ताने या वडिल मुलीच्या तसेच बाप लेकांवर नजर टाकणार आहोत...

या स्टार किड्सच्या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ कोठारेची मुलगी जिजाचं. आदिनाथ जिजाचे व्हीडिओ अनेकदा व्हायरल होतात. उर्मिलासोबतच जिजाचे सुद्धा लाखो चाहते आहेत. आदिनाथ जिजाच्या क्युट व्डिहीडिओंचा सोशल मीडियावर खूप बोलबाला असतो.

अभिनेता स्वप्नील जोशीची मुलं मायरा आणि राघवचे क्युट फोटो तसेच व्हीडिओ कौतुकाचा विषय ठरतात.सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा असते.

अभिनेता अंशुमन विचारेची मुलगी अन्वी ही सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या गोड व्हीडिओंना तासाभरात लाखो व्हूज येतात.कधी बाबाला दम भरताना तर कधी बाबासोबत डान्स करताना अवनीचे गोड व्हीडिओ चाहत्यांना खूप आवडतात...

बिग बॉस फेम पुष्कर जोगची मुलगी फेलिशासोबतचे मस्ती करतानाचे व्हिडीओ, तर कोरोनासंबंधी जागरुरकता करतानाचे व्हिडीओ सोबतच कुकिंगचे व्हिडीओही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

या सगळ्यात कौतुकाचा ठरलाय तो गश्मीर महाजनीचा मुलगा व्योम . बाबाच्या वर्कआऊटमध्ये डिस्ट्रब कराणाऱ्या या चिमुकल्याने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय. यासोबतच बाबासोबतचे त्याचे अनेक व्हिडीओ खूपच गोड असतात.

सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीची मुलगी अवनी जोशी हीची दखील सोशल मीडियावर बरीच चर्चा असते...सात वर्षांच्या अवनीला गाण्यासोबतच अभिनयाची देखील आवड आहे. अवनीने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे सूत्रसंचलन केलेय तसेच स्टार प्रवाहच्या साथ दे तू मला या मालिकेत अवनी बालकलाकाराच्या रुपात दिसली होती.

गायक राहुल देशपांडेची मुलगी रेणुकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसतायेत. कधी बाबाला लाईव्हसाठी गाईड करताना व्हिडीओ तर कधी आपल्या सुंदर केसांचा रहस्य सांगणारा व्हिडीओ. रेणुकाचे हे व्हिडीओ कौतुकाचा विषय ठरत आहेत.

सिद्धार्थ जाधवला इरा आणि स्वरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ बऱ्याचदा त्यांच्यासोबतचे व्हिडीओ शेअर करत असतो. या बापलेकींच्या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.