तू जणू जलपरी! मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट; चाहत्यांनी दिली पसंती, तुम्ही ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:32 IST2025-11-10T12:11:04+5:302025-11-10T12:32:50+5:30
मराठी अभिनेत्रीचं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

एका मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. पडद्यावर सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सोनाली कुलकर्णी. सोनालीने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधलंय

सोनाली कुलकर्णी सध्या परदेशात भटकंती करताना दिसत आहे. तिने समुद्रकिनारी खास कपडे परिधान करुन हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

केनिया येथील मोंबासा बीचवर सोनाली कुलकर्णीने हे फोटोशूट केलंय. सोनालीचे हे फोटो पोस्ट होताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

'जल भुन के राख होने से पहले के क्षण', असं खास कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिलं आहे. सोनाली व्यस्त कामातून वेळ मिळेल तशी जगातील विविध ठिकाणी भटकंती करताना दिसते

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिचा आगामी सिनेमा 'रावसाहेब'ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे

रिअल लाईफमध्ये सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. सध्या सोनाली फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे

















