बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सोनाली खरेने केलंय लग्न; 'प्यार तो होना ही था' सिनेमात केलंय त्याने काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:03 PM2022-03-27T13:03:31+5:302022-03-27T13:06:38+5:30

Sonali khare: अलिकडेच तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर अनेक जण तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठी कलाविश्वाकतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे.

विविधांगी भूमिका साकारत सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोनाली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफविषयीचे फोटो शेअर करत असते.

कलाविश्वाप्रमाणेच सोनाली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफविषयीचे फोटो शेअर करत असते.

यात अलिकडेच तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर अनेक जण तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सोनाली खरेचा नवरादेखील तिच्यासारखाच उत्तम अभिनेता असून त्याने हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बिजय आनंद असं सोनालीच्या नवऱ्याचं नाव आहे. सोनाली आणि बिजय यांचं लव्हमॅरेज आहे.

‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

बिजय आनंदने १९९८ साली 'प्यार तो होना ही था' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

या चित्रपटात काजोल आणि अजय देवगणसह बिजय आनंदच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती.

‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे सिनेमे आणि काही हिंदी टीव्ही मालिकेमध्ये बिजय आनंदने मुख्य भूमिका साकारली आहे.

सोनाली आणि बिजय यांना एक मुलगी आहे तिचे नाव सानया आहे.