८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले दिलीप प्रभावळकर? अभिनेत्याने दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:02 IST2025-09-15T15:46:44+5:302025-09-15T16:02:14+5:30
इतका मोठा नट पण ते व्यसनापासून अलिप्त राहिले आणि कधीच यामागे अडकले नाहीत. ८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले याचं दिलीप प्रभावळकरांनी अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं.

'दशावतार' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दिलेल्या मुलाखतींमधून दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत आहेत.
दिलीप प्रभावळकर यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. मात्र अजूनही ते तितकेच फिट दिसतात.
एक सो एक हिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. मात्र सिनेसृष्टीच्या ग्लॅमरसपणाला ते भुलले नाहीत.
इतका मोठा नट पण ते व्यसनापासून अलिप्त राहिले आणि कधीच यामागे अडकले नाहीत. एबीपी माझाच्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले याचं दिलीप प्रभावळकरांनी अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं.
ते म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे मी खरोखरच सभ्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे माझ्या मनात असं काही करावंसं वाटत असतं. पण माझ्यात ते करण्याची डेरिंग नाही".
"आणि तिसरी शक्यता अशी की सगळं करून सावरुन मी नामानिराळा राहण्याइतका हुशार आहे. आता तुम्ही ठरवा यातलं काय कारण असू शकतं".
दरम्यान, दशवतार हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.