'अश्विनी ये ना...'मधील अशोक सराफ यांची नायिका आता दिसते अशी, अभिनेत्रीचं केदार शिंदेंसोबत खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:05 IST2025-07-15T12:53:52+5:302025-07-15T13:05:04+5:30

'गंमत जंमत' या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' हे गाणे खूप गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीमधून गायब आहे.

१९८७ साली गंमत जंमत हा क्लासिक सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

गंमत जंमत या सिनेमात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारूशीला साबळे, सतीश शाह, सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशालता आणि विजू खोटे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

गंमत जंमत या चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणे खूप गाजले होते. हे गाणं अशोक सराफ आणि चारूशीला साबळे यांच्यावर चित्रीत झाले आहे. चारूशीला साबळे सध्या सिनेइंडस्ट्रीमधून गायब आहेत.

अभिनेत्री चारूशीला साबळे शाहिर साबळे यांच्या कन्या आहेत. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या त्या मावशी आहेत. त्या एक अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगणा आहेत. चारूशीला साबळे यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी १९८२ साली त्यांच्या करिअरची सुरूवात केली. त्यांनी गंमत जंमतशिवाय मी सिंधुताई सपकाळ, गाव तसं चांगलं, यमाच्या गावाला जाऊ या, ऑक्सिजन या सिनेमात काम केलंय.

चारूशीला यांनी अंजाने रिश्ते, कयामत से कयामत तक या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय त्यांनी हिंदी मालिकेतही काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी अभिनेता अजित वच्छानी यांच्यासोबत लग्न केले होते. अजित वच्छानी यांचे २५ ऑगस्ट, २००३ साली निधन झाले.

चारूशीला आणि अजित यांना दोन मुली असून त्यांचं नाव आहे योहाना आणि त्रिशला. त्रिशला एअर हॉस्टेस आहे तर योहाना हीदेखील अभिनेत्री आहे.