अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:06 PM2023-06-09T15:06:37+5:302023-06-09T15:12:14+5:30

Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले.

मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाषचा आज म्हणजेच ९ जूनला वाढदिवस साजरा करते आहे. पल्लवी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आली होती.

एकेकाळी पल्लवी आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते क्षणार्धात संपुष्ठात आले.

८ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ते विभक्त झाले. या ब्रेकअप करण्यामागचे कारण पल्लवी सुभाषने सांगितले.

ब्रेकअपबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवी सुभाष म्हणाली की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत हे खरे आहे. हा निर्णय आम्ही दोघांनि मिळून घेतला.

ती पुढे म्हणाली की, ही आमची खाजगी बाब असल्यामुळे आमच्या ब्रेकअपचे कारण काय आहे हे मी सांगू इच्छित नाही.

एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे असे तुम्हाला वाटत असते. मात्र काही वर्षांनंतर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही याची तुम्हाला जाणीव होते. ब्रेकअप ही फार वाईट गोष्ट आहे, असेही ती म्हणाली.

मी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळातून जात आहे. दोघांचे चांगले व्हावे असाच नेहमी विचार करतो. त्यामुळे एकमेकांशी न बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कायम मित्र राहणार असे तिने यावेळी म्हटले.

त्यानंतर अनिकेत विश्वासरावने अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत लग्न केले.

मात्र त्या लग्नातही अनेक समस्या आल्या.