अलका कुबल यांच्या लेकीनं लग्नानंतर साजरी केली पहिली मकरसंक्रांत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:49 PM2023-01-26T19:49:13+5:302023-01-26T19:52:34+5:30

Alka Kubal : सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अलका कुबल यांची लेक इशानीनं लग्नानंतर पहिली मकरसंक्रांत साजरी केली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अलका कुबल यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

'माहेरची साडी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अलका कुबल यांचा कलाविश्वात स्वतंत्र चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अलका कुबल यांची लेक इशानीनं लग्नानंतर पहिली मकरसंक्रांत साजरी केली.

इशानीच्या पहिल्या मकरसंक्रांतीचे फोटो अलका कुबल यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अलका कुबल यांनी फोटो शेअर करत लिहिले की, ईशानीची पहिली मकरसंक्रांत

अलका कुबल यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

इशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

इशानी वैमानिक आहे. तिच्यामध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचा निश्चय केला.

अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे.