प्राजक्ता माळीला कोणता पदार्थ जास्त आवडतो? अभिनेत्रीने दिलेलं उत्तर ऐकून चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:54 IST2025-09-27T11:37:39+5:302025-09-27T11:54:18+5:30
प्राजक्ता माळीने नुकतंच अमित फाळकेंच्या MHJ Unplugged ला दिलेल्या मुलाखतीत ही खास गोष्ट सर्वांसोबत शेअर केली

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. प्राजक्ताने नुकतीच MHJ Unplugged या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली
त्यावेळी मुलाखतकार अमित फाळकेंनी प्राजक्ताला तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारलं. प्राजक्ताने जो पदार्थ सांगितला तो ऐकून तुम्हीही चकीत व्हाल
प्राजक्ता माळी मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारताना दिसते. पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र सर्वसामान्य माणसांसारखं जीवन जगते.
प्राजक्ता माळीने MHJ Unplugged ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी अतिशय रुक्ष आयुष्य जगतेय. अतिशय सोपं-साधं आयुष्य जगायला मला आवडतं
प्राजक्ता पुढे म्हणाली, वरण-भात आणि तूप ही माझी आवडती डिश आहे. अशाप्रकारे प्रत्यक्ष आयुष्यात प्राजक्ताला साधं राहणीमान आणि साधा आहार घ्यायला आवडतो
अनेकांना प्राजक्ताने सांगितलेला या पदार्थाचं नाव ऐकून चकीत व्हायला झालं. कोणत्याही चमचमीत पदार्थाचं नाव न सांगता वरण-भात-तूप असं प्राजक्ता म्हटल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलं.
एकूणच सेलिब्रिटी ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असले तरीही प्रत्यक्ष आयुष्यात ते साधं राहणीमान पसंत करतात. प्राजक्ता माळी ही अशाच सेलिब्रिटींचं उदाहरण आहे