परी म्हणू की अप्सरा! सिंपल लूकमध्ये मृण्मयीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:31 PM2024-03-07T17:31:41+5:302024-03-07T17:36:49+5:30

Mrunmayee despande: सध्या सोशल मीडियावर मृण्मयीचे साडीतील काही सुरेख फोटो व्हायरल होत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अनेक मालिका, चित्रपटांत काम करून मृण्मयीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच मृण्मयीने अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर मृण्मयीचे साडीतील काही सुरेख फोटो व्हायरल होत आहेत.

मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर तिचे काही खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाइट रंगाची सुरेख साडी नेसली आहे.

मृण्मयीच्या सिंपल लूकची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

मृण्मयी लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने 'नटसम्राट', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'चंद्रमुखी', 'भाई : व्यक्ती की वल्ली' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.