Photos: तुझी प्रत्येक अदा करते घायाळ... अभिनेत्री तितीक्षा तावडेचं नवं फोटोशूट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:23 IST2024-11-15T17:06:45+5:302024-11-15T17:23:40+5:30
तितीक्षा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
तितीक्षा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
आताही तिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या नव्या फोटोंचा सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय.
तिने साडीवर काळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. यात अगदी हलका मेकअप आणि मोकळे केस असा लूक तिने केलाय.
या लूकमधील प्रत्येक फोटोमध्ये तितीक्षाची सुंदरता बहरुन आली आहे.
चाहते देखील अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
तितीक्षा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. वेस्टर्न असो किंवा देसी तिची प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते.
सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितीक्षाने नेत्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
काही महिन्यांपूर्वीच तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली.