अभिनेत्यांपेक्षाही हँडसम आहे स्वरांगी मराठेचा नवरा; कलाविश्व सोडून अन्य क्षेत्रात करतोय करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:36 IST2023-04-03T14:32:01+5:302023-04-03T14:36:16+5:30

Swarangi marathe: जाणून घ्या, 'आई कुठे काय करते'फेम अनुष्काच्या रिअल लाइफ आशुतोषविषयी

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, गायिका म्हणजे स्वरांगी मराठे.

अलिकडेच स्वरांगी आई कुठे काय करते या मालिकेत झळकली होती.

'आभाळमाया' या मालिकेत चिंगी ही बालकलाकाराची भूमिका साकारुन स्वरांगी विशेष लोकप्रिय झाली.

'आभाळमाया' नंतर काही मोजक्या मालिकांमध्ये झळकल्यानंतर स्वरांगी कलाविश्वापासून दूर झाली होती.

लग्नानंतर स्वरांगीने पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण केलं. त्यामुळे मराठीसह ती बॉलिवूडमध्येही झळकली आहे.

'बाजीराव मस्तानी' या सिनेमात स्वरांगीने झुमरीची भूमिका साकारली होती.

सध्या सोशल मीडियावर स्वरांगीच्या पर्सनल लाइफची चर्चा होत आहे.

स्वरांगीने २०१६ मध्ये निखील काळे सोबत लग्नगाठ बांधली.

स्वरांगीचा नवरा कलाविश्वाशी संबंधित नसून अन्य दुसऱ्या क्षेत्रात काम करत असल्याचं म्हटलं जातं.

निखील आणि स्वरांगीला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुलं आहेत.