काळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न साडीत श्रेया बुगडेचं लेटेस्ट फोटोशूट; नेटकरी होतायेत घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:21 IST2022-06-16T17:15:54+5:302022-06-16T17:21:32+5:30
Shreya bugade:अलिकडेच श्रेयाने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही मोजके फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आपल्यातील विनोदशैली दाखवून श्रेयाने अल्पावधीत प्रेक्षकांच मन जिंकलं.
श्रेया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
अलिकडेच श्रेयाने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही मोजके फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्रेयाने काळ्या रंगाच्या साडीमध्ये छानसं फोटोशूट केलं आहे.
श्रेयाने साडीला इंडो-वेस्टर्न टच दिल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.
नाकात नथ, छानशी हेअर स्टाइल यामुळे श्रेया चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
श्रेयाने एका साडीच्या ब्रँडसाठी हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.