काळी साडी अन् सिव्हलेस ब्लाऊज; साध्याशा लूकमध्येही रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:59 IST2022-05-31T18:55:28+5:302022-05-31T18:59:39+5:30

Rinku rajguru:अलिकडेच रिंकूने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

पहिल्याच चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांना 'याड' लावलं. त्यामुळेच सैराटनंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली.

अलिकडेच रिंकूचा झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला अमिताभ बच्चनसोबत काम करायची संधी मिळाली.

कलाविश्वासह रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

रिंकू वेस्टर्न आऊटफिटसह पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारातही तिचे फोटो शेअर करत असते.

अलिकडेच रिंकूने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

रिंकू लवकरच किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावणार आहे. या शोवेळी तिने ही साडी परिधान केली होती.

रिंकूने या फोटोसाठी वेगवेगळ्या सुंदर पोझ देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रिंकू सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने सैराट, कागर, मेकअप, झुंड असा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.