वेस्टर्न ड्रेसमध्ये प्राजक्ताने फ्लाँट केली टोंड फिगर; नव्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:41 IST2022-04-05T15:35:33+5:302022-04-05T15:41:24+5:30
Prajakta mali: अलिकडेच प्राजक्ताने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये झळकलेली प्राजक्ता आज प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

कलाविश्वाप्रमाणेच तिचा सोशल मीडियावरही चांगला वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच प्राजक्ताने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाचा वनपीस गाऊन परिधान केला आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसत असून तिने त्या पद्धतीच्या पोझही दिल्या आहेत.

प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून दाद मिळत असते.

प्राजक्ता गेल्या कित्येक दिवसांपासून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे.
















