PHOTO: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सुंदर नृत्याविष्कार; शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:46 IST2025-02-17T16:28:46+5:302025-02-17T16:46:01+5:30
अभिनेत्री मीरा जोशी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून अभिनेत्री घराघरात पोहोचली.
मीराने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मीरा उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्कृष्ट नृत्यांगना सुद्धा आहे.
याशिवाय 'पानिपत' चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज मीराने दिला आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या नृत्याविष्काराचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये मीरा भरतनाट्यम नृत्य करताना दिसते आहे.
मीराचा या फोटोंमधील लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलाय.