हनीमूनसाठी गेलेल्या हृताचा रोमॅण्टिक अंदाज; प्रतिकसोबत शेअर केला खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 15:56 IST2022-05-24T15:50:59+5:302022-05-24T15:56:45+5:30
Hruta durgule:सध्या हृता, प्रतिकसोबत टर्कीमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. फुलपाखरु, दुर्वा या मालिकांसह अनेक नाटकांमध्ये झळकलेली हृता आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे कायम चर्चेत येणारी हृता सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
काही दिवसांपूर्वीच हृताने प्रतिक शाहसोबत थाटात लग्न केलं. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो टाकत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
सध्या सोशल मीडियावर हृताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतानाच आता तिच्या हानीमुनचे फोटोही समोर आले आहेत.
सध्या हृता, प्रतिकसोबत टर्कीमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हृताने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.
हृता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून मालिकांसह ती नाटकांमध्येही झळकली आहे.
हृताने शेअर केलेला हनीमून स्पेशल फोटो
हृता कोणत्याही आऊटफिटमध्ये सुंदर दिसते. त्यामुळे तिच्या या फोटोनेदेखील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हृता आणि प्रतिकचा रोमॅण्टिक फोटो