'पछाडलेला'मधील दुर्गा मावशीची लेक आता काय करते? इतक्या वर्षात झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:47 PM2021-12-17T14:47:07+5:302021-12-17T14:59:38+5:30

Ashwini kulkarni: 'पछाडलेला' या चित्रपटानंतर अश्विनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला पछाडलेला चित्रपट आठवतो का?

कलाकारांच्या अभिनयाने संपन्न असलेला हा चित्रपट मराठी कलाविश्वात चांगलाच गाजला होता. या चित्रपटात झळकलेला प्रत्येक कलाकार मराठी कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण करुन आहे.

या चित्रपटामध्ये हॉरर स्टोरी दाखवण्यासोबतच रवी आणि मनिषा यांची सुंदर लव्हस्टोरीही दाखवली होती.

या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने मनिषाची भूमिका साकारली होती.

दुर्गा मावशी लेक म्हणून मनिषा या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. पण या चित्रपटानंतर मनिषा म्हणजे अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडतो.

पछाडलेला या चित्रपटानंतर अश्विनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकली आहे.

अलिकडेच ती ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात झळकली होती.

अश्विनीचा कलाविश्वात चांगला वावर असून ती सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.