‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडी नेसून फोटोशूट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 20:07 IST2023-09-04T19:54:20+5:302023-09-04T20:07:58+5:30
शिवाली ही हास्यजत्रेत प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिच्या चाहत्यावर्गामध्येही वाढ झाली आहे.

हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीतील अवली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. आपल्या विनोदाने आणि अभिनयाने तिने सर्वांची मनं जिंकली.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत असते. या अभिनेत्री नुकतंच एक हटके फोटोशूट केलं.
हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "मस्त नज़रों से अल्लाह बचाये, महजमालों से अल्लाह बचाये!", असे कॅप्शन तिनं दिलं आहे.
गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य अगदी खुलून नजरेत भरत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर अनेकांनी हार्ट, फायर इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले.
शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती.
शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.