"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..."
By कोमल खांबे | Updated: April 20, 2025 14:07 IST2025-04-20T14:01:29+5:302025-04-20T14:07:52+5:30
समीर चौघुलेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला.

विनोदी नट समीर चौघुले हे अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत प्रेक्षकांना हसवतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ते घराघरात पोहोचले.
आता समीर चौघुले 'गुलकंद' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाच्या निम्मिताने त्यांनी बोल भिडूला मुलाखत दिली. या मुलाखतीत समीर चौघुलेंनी बालपणीचा किस्सा सांगितला.
"लहानपणी मी हरवलो होतो. तेव्हा मी ५-६ वर्षांचा असेन. पोलीस कम्प्लेंटही झालेली होती. पोलीस आमच्या घरी आलेले होते".
"मी घरातच होतो. घरात एक कपाट होतं. त्या कपाटाच्या आत मी कंदालाशी खेळत बसलो होतो. कंदिलाची वात वर करून खाली करायची...आणि कपाटाचं दार बंद झालेलं होतं".
"आई कोर्टात कामाला होती आणि बाबा दादरला...घरात आजी होती मला सांभाळायला. आजीला वाटलं हरवला".
"त्यावेळी रामन राघव नावाचा एक सिरियल किलर फिरायचा. त्याची दहशत असायची. तो मुंगीच्या रुपात, कुत्र्याच्या रुपात येतो अशी अफवा असायची. सगळे त्या मुंग्यांना मारायचे".
"कोणीतरी सांगितलं की समीर सारखा एक मुलगा बोरीवलीकडे जाताना दिसला. आजी रडतेय, आत्या रडतेय".
"पोलीस कम्प्लेंट झाल्यानंतर पोलीस घरी आले. आणि त्यांनी बघितलं की हा कार्टा घरातच बसलाय. असं झापलं त्यांनी सगळ्यांना...त्यांनी कपाटाचं दार उघडलं आणि त्यांना मी दिसलो".