होली है...! होळीच्या रंगात रंगले बॉलिवूड, पाहा धम्माल मस्तीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 12:33 IST2020-03-11T12:27:22+5:302020-03-11T12:33:52+5:30
SEE PICS: बॉलिवूडची होळी...

काल होळी सण देशभर उत्साहात साजरा झाला. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही उत्साहात हा सण सण साजरा केला. रंगाची उधळण, धम्माल मस्ती करतानाचे अनेक फोटो सेलिब्रिटींनी शेअर केले आहेत. करिना कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात तिच्या गालावर गुलाबी गुलाल लागलेला दिसतोय.
करिनाचा लाडका तैमूर यानेही अशा नवाबी थाटात होळी साजरी केली.
सोहा अली खानने मुलीसोबत होळी खेळली.
निक जोनासने पहिल्यांदा भारतात होळी साजरी केली. यावेळी प्रियंका व निक यांनी धम्माल मस्ती केली.
प्रिती झिंटा ही सुद्धा होळीच्या रंगात रंगलेली दिसली. यावेळी तिचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळाला.
होळी पार्टीत प्रिती झिंटा व युलिया वंतूर धम्माल मस्ती करताना दिसले.
सनी लिओनीने संपूर्ण कुटुंबासोबत होळी साजरी केली.
सोनाक्षी सिन्हाही खास मूडमध्ये दिसली.
विद्या बालन हिने रंगांची उधळण केली.
करिश्मा कपूरनेही होळी एन्जॉय केली.
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने अशी मस्त होळी साजरी केली.