मिसेस धवल पाटील! पाहा, ‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळेचे लग्नानंतरचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:41 IST2022-04-26T15:35:53+5:302022-04-26T15:41:49+5:30
Sayli Kamble share photos after wedding : मिसेस धवल पाटीलने लग्नानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळे गेल्या रविवारी लग्नबंधनात अडकली. प्रियकर धवलसोबत तिने लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
आता मिसेस धवल पाटीलने लग्नानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
गेल्या रविवारी महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायलीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लग्नात सायली पिवळ्या रंगाच्या नऊवारीत दिसली होती. ताज्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या पैठणीत कमालीची सुंदर दिसतेय.
हातात हिरवा चुडा, नाकात नथ, भांगात कुंकू अशा लुकमध्ये सायली तिच्या सासरच्या मंडळींसोबत दिसतेय.
सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने दाखवली होती. प्री-वेडिंग फोटोशूट अनेक फोटो तिने शेअर केले होते.
सायली कांबळेने ‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती.
‘इंडियन आयडल 12’मध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा अशीच रंगली होती. शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता.