कियारानंतर आणखी एका जगप्रसिद्ध स्टारची Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंपसह एन्ट्री, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:12 IST2025-05-06T14:00:25+5:302025-05-06T14:12:52+5:30

प्रेग्नंसीतही ग्लॅमर टॉपवर! तीचा लूक बघून सगळे फॅशन प्रेमी फिदा!

Met Gala 2025 हा फॅशन जगतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा इव्हेंट न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे पार पडला. यावेळी हॉलिवूडसह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिने यंदा पहिल्यांदाच Met Gala मध्ये सहभाग घेतला. कियाराने (Kiara Advani Shows Baby Bump At Met Gala Event) आपल्या बेबी बंपसह रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूकमध्ये एन्ट्री घेतली होती.

पण, यावेळी Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करणारी कियारा ही एकटी नाही ठरली. तर जगप्रसिद्ध स्टार रिहाना (Rihanna Reveals Her Baby Bump At Met Gala 2025) हीदेखील बेबी बंपसह ढासू लूकमध्ये पाहायला मिळाली.

रिहानाने राखाडी टू-पीस आउटफिटसह काळा ब्लेझर परिधान केलं होतं. यावर तिनं स्टायलिश हॅट कॅरी केली. ज्यामुळे तिचा लूक आणखी रॉयल दिसला.

रिहानाचा मेकअप सटल, ब्रॉन्झ टोनमधला होता, ज्यात गडद आईलाइनर व ग्लॉसी लिप्समुळे तिचा ग्लो अधिक उठून दिसत होता. ज्याने ती इतर सेलिब्रिटींपेक्षा उठून दिसली.

रेड कार्पेटवर ती आत्मविश्वासाने चालताना दिसली. कॅमेऱ्यांकडे हात हलवत तिनं चाहत्यांची मन जिंकली आहेत. तिचे चाहते रिहानाला "Queen of Met Gala" असंदेखील म्हणत आहेत.

रिहाना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या लूकने सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळवली असून अनेक चाहते आणि स्टार्सनी तिचं कौतुक केलं.

पण, Met Gala मध्ये मातृत्व आणि फॅशनचा संगम पाहायला मिळणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. कियारा आणि रिहानाआधी प्रसिद्ध निवृत्त टेनिसपटू सेरेना विल्यम्सने २०२३ साली मेटा गालामध्ये बेबी बंप दाखवला होता. तसेच अभिनेत्री ली मिशेल हिने २०२४ च्या मेटा गाला मध्ये सुंदर निळ्या ड्रेसमध्ये आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला होता.

जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहाना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे. रिहाना आधीच दोन मुलांची आई आहे. तिने मे २०२२ मध्ये (Gave birth RZA) तिच्या पहिल्या मुलाला तर ऑगस्ट २०२३ मध्ये (Gave birth RZA) दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. रिहाना गेल्या अनेक वर्षापासून रॅपर रॉकीसोबत (A$ap Rocky) आहे.

रिहाना केवळ पॉप म्युझिक स्टार नसून अब्जाधीश बिझनेसवुमन देखील आहे. टाईम मॅगझीनने जगातल्या १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत रिहानाचा समावेश दोनदा म्हणजेच २०१२ आणि २०१८ साली केला होता.