नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
By देवेंद्र जाधव | Updated: May 21, 2025 12:35 IST2025-05-21T12:06:40+5:302025-05-21T12:35:27+5:30
सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागपूरच्या मराठी मुलीने जगाचं लक्ष वेधलंय. ग्लॅमरस फॅशन करुन या मुलीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. कोण आहे ती?

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटींनी त्यांच्या अनोख्या फॅशनने जगाचं लक्ष वेधलं. या सर्व सेलिब्रिटींच्या मांदियाळीत नागपूरची मराठमोळी लेक कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली
कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकलेल्या या अप्सरेचं नाव आहे मधुलिका जगदाळे. मधुलिका गेल्या अनेक वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहेत
मधुलिकाची मुलगी जिया जगदाळे सुद्धा फॅशनच्या दुनियेत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मधुलिका आणि जिया या दोघीही अनेकदा एकाच फॅशन स्पर्धेत भाग घेताना दिसतात
UMB Elite Mrs India 2024 या फॅशन स्पर्धेत माय-लेकींनी भाग घेतला होता. त्यावेळी मधुलिका स्पर्धेच्या विजेती ठरली. तर त्यांची मुलगी जिया उपविजेती ठरली
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सातव्या दिवशी मधुलिकाने रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूकने हजेरी लावली. मधुलिकाचा ग्लॅमरस लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता
फॅशनच्या दुनियेत मधुलिका आणि जिया या मायलेकींच्या जोडीची चर्चा आहे. मधुलिका आणि जिया एकत्र आल्यावर आई-मुलगी न वाटता बहीणींचीच जोडी वाटतात
स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मधुलिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यामुळे मधुलिका यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांची शान उंचावली असून इतरांना प्रेरणा दिली आहे.