भलतंच फॅड! देशातील सर्वात मोठी ब्रेस्ट साइज हवी म्हणून हॉलिवूड स्टारनं केल्या १६ सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:42 AM2022-12-23T11:42:18+5:302022-12-23T11:46:35+5:30

४४ वर्षीय हॉलिवूड स्टारच्या या हट्टापायीचं नवऱ्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ती आहे ५ मुलांची आई.

हॉलिवूड मॉडेल, सिंगर केटी प्राइस तिच्या कामापेक्षा जास्त शरीरावर करणाऱ्या विविध प्रयोगांसाठी ओळखली जाते. केटीने तिच्या शरीरावर आतापर्यंत बऱ्याच सर्जरी केल्या आहेत त्या कदाचित तिला आठवतंही नसेल.तरीदेखील आता ती पुन्हा एकदा सर्जरी करणार आहे. केटी १६ व्या वेळा तिचे ब्रेस्ट इम्प्लांट्स करणार आहे.

केटी प्राइस ४४ वर्षांची आहे. तरीदेखील मॉडेलने कित्येकदा आपल्या शरीराच्या विविध भागांची सर्जरी केली आहे.

केटीचं स्वप्न आहे की, तिला जगातील सर्वात मोठे ब्रेस्ट असणारी महिला बनण्याचा रेकॉर्ड करायचा आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे.

केटी पाच मुलांची आई आहे आणि नुकतीच ती नवरा कीरन हेलरपासून विभक्त झाली आहे. कीरनने देखील तिच्या या वेडेपणामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

केटी प्राइसने नुकताच इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती ऑपरेशननंतर बेडवर आराम करताना दिसते आहे. मीडिया रिपोर्टनुसार सर्वात मोठे ब्रेस्टच्या इच्छेखातर तिने इम्प्लांट करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरेतर तिच्या इतक्या सर्जरीनंतर तिला डॉक्टरांनी इम्प्लांट न करण्याचा सल्ला दिला आहे.

१९९५ सालापासून आतापर्यंत केटीने राइनोप्लास्टी, सिलाउट फेसलिफ्ट, थ्रीडी, वीनर आणि बोटोक्ससारख्या कॉस्मेटिक ट्रिटमेंट घेतली आहे. याशिवाय तिने बम्पपासून लिप्स, स्कीन आणि ब्रेस्टचीदेखील सर्जरी केली आहे.

२०१७ साली केलेल्या सर्जरीदरम्यान तिचा चेहरादेखील बिघडला होता.

आपल्या सर्जरीबद्दल केटी प्राइसने बिग ब्रदर सेलिब्रेटी शोमध्ये सांगितले होते की, मी आतापर्यंत इतक्या वेळा ब्रेस्ट इम्प्लांट्स केल्या आहेत की आता काहीच उरलेलं नाही. सर्व निशाण्यांवर सेप्टिक झालं आहे.

या शोमध्ये ती हेदेखील म्हणाली ती, माझ्यावर लावलेले सिलिकॉन मी मेल्यानंतर स्वतःसोबत घेऊन जाईन.