Baby's Day Out मधला क्यूट बेबी आठवतोय? जुळ्या भावांनी साकारलेली भूमिका, आता दिसतात एकदम हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:08 IST2025-07-22T17:34:30+5:302025-07-22T18:08:51+5:30
Baby's Day Out सिनेमातील या छोट्या बिंक नावाच्या बेबीने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण तुम्हाला माहितीये का या गोंडस, निरागस बाळाची भूमिका जुळ्या भावांनी साकारली होती.

Baby's Day Out हा ९०च्या दशकातील हॉलिवूडचा सगळ्यात लोकप्रिय सिनेमा. १९९४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.
या सिनेमाचा 'हे बेबी' या नावाने हिंदीतही रिमेक झाला होता. एका छोट्या लहान बाळाला किडनॅप करणाऱ्या तिघांना ते बाळ सळो की पळो करून सोडतं.
Baby's Day Out सिनेमातील या छोट्या बिंक नावाच्या बेबीने सगळ्यांनाच भुरळ घातली होती.
पण तुम्हाला माहितीये का या गोंडस, निरागस बाळाची भूमिका जुळ्या भावांनी साकारली होती.
अॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकॉब वॉर्टन हे जुळे भाऊ बेबी बिंकच्या भूमिकेत होते.
आता ते जवळपास ३० वर्षांचे झाले आहेत. आणि खूपच हँडसम दिसतात.
Baby's Day Outनंतर ते कुठल्याच सिनेमात दिसले नाहीत. पण, सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो आहेत.