बापरे! वयाच्या ३७ व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलंय टक्कल, कारण ऐकून व्हाल थक्क

By देवेंद्र जाधव | Updated: January 30, 2026 10:35 IST2026-01-30T10:20:56+5:302026-01-30T10:35:47+5:30

मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने टक्कल केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच थक्क झाले आहेत. टक्कल करण्यामागचं कारण ऐकून अभिनेत्रीचं सर्वजण कौतुक करत आहेत

मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने टक्कल केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच थक्क झाले आहेत.

या अभिनेत्रीचं नाव आहे इमा स्टोन. कलाकार भूमिकेसाठी कोणत्या थराला जाऊन मेहनत करतात याची अनेक उदाहरणं आजवर सांगता येतील. इमाने सुद्धा भूमिकेसाठी अशीच मेहनत घेतलीये

इमाचा एक सिनेमा आला ज्याचं नाव 'बुगोनिया'. हा सिनेमा यावर्षी अर्थात २०२६ च्या ऑस्करसाठी नॉमिनेटेड आहे. या सिनेमासाठी इमाने तिचे सर्व केस उडवले आणि Bald लूक केला.

टक्कल करण्याऐवजी आपण प्रोस्थेटिकचा वापर करुन केस वाचवू शकतो, असं सिनेमाच्या टीमने इमाला सांगितलं होतं. परंतु भूमिकेमध्ये खरेपणा यावा आणि मानसिकता दिसावी म्हणून इमाने टक्कल करायचं ठरवलं.

विशेष म्हणजे 'बुगोनिया' सिनेमात ऑन स्क्रीन हे टक्कल करण्यात आलं आहे. सीन चालू असताना सहकलाकार इमाच्या डोक्यावरील केस उडवतो असं दृश्य आहे. त्यावेळी इमा बेशुद्ध असते.

सिंगल टेक सीनमध्ये हा सीन शूट करण्यात आला आहे. त्यामुळे सीन सुरु असताना इमाला अभिनयही करायचा होता याशिवाय डोक्यावरील केस गेले हे जाणवूही द्यायचं नव्हतं.

अशाप्रकारे इमाने भूमिकेसाठी हा धाडसी निर्णय घेतला. इमाला 'बुगोनिया'मधील या भूमिकेसाठी यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं आहे