Emmy Awards 2022: एमी अवार्ड सोहळ्यातही खूप झाला ‘ड्रामा’, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:29 PM2022-09-13T15:29:38+5:302022-09-13T15:39:40+5:30

Emmy Awards 2022: अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74 व्या एमी अवार्डचा शानदार सोहळा रंगला. नेहमीप्रमाणे या अवार्ड शोमध्येही ड्रामा पाहायला मिळाला...

आऊटस्टँडिंग राइटिंगमध्ये एमी अवार्ड जिंकणारा हा अभिनेता पाहा. याचं नाव Jerrod Carmichael. याला पाहून कदाचित तुम्हाला रणवीर सिंगची आठवण होईल.

कॉमेडी सीरिजमध्ये आऊटस्टँडिंग राइटिंगसाठी अवार्ड जाहिर झाला आणि यादरम्यान जिमी किमेलने मंचावर असं काही केलं.

स्टेजवर असा ड्रामाही पाहायला मिळाला. Jimmy Kimmelचे पाय पकडून Will Arnett त्याला असं ओढताना दिसला.

अवार्ड जिंकल्यानंतर लिजो अशी भावुक झाली. पण तिला भावुक होताना पाहून याला मात्र हसू आवरलं नाही.

लिजो मंचावरचं ढसाढसा रडली. माझ्या शरीरावरून, रंगावरून लोकांनी मला खूप काही ऐकवलं, हे सांगताना ती भावुक झाली.

Chrissy Teigen या अभिनेत्रीने या अवार्ड शोमध्ये आपला बेबी बम्प फ्लॉन्ट केला.