बाप्पाची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री कोण? शाहरूख, सलमानसोबत हिट सिनेमांमध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:17 IST2024-09-13T18:18:34+5:302024-09-13T19:17:26+5:30
Guess Who Bollywood Actress, Ganapati Bappa: करण अर्जुन, कोयला, बादशाह सारखे बॉलिवूडपट आणि शक्तीमान, बिग बॉस सारख्या TV शो मधून ही अभिनेत्री झळकली आहे

Bollywood Actress Celebrity Ganapati Bappa:
सध्या देशभरात गणपती बाप्पाचे आगमन झाले असून सर्वजण त्याच्या सेवेत आणि भक्तीमध्ये लीन झाले आहेत.
सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचे चाहत्यांना विशेष कौतुक असते. बाप्पाची सजावट, आरास पाहायला ते उत्सुक असतात.
हा गणपती बाप्पा आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरचा. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसह तिने स्क्रीन शेअर केलाय.
करण अर्जुन, कोयला, बादशाह, दिललगी, कॉर्पोरेट यांसारख्या हिट सिनेमामध्ये या अभिनेत्रीने अभिनय केला आहे.
आकर्षक फुलांची आरास असलेला हा गणपती बाप्पा आहे सेलिब्रिटी-मॉडेल-अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिच्या घरातला.
दीपशिखाने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपट तर 'शक्तीमान'पासून ते बिग बॉसपर्यंत ३६हून अधिक टीव्ही शो केले.
दीपशिखाच्या घरातल्या बाप्पाला सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. पारंपरिक पेहरावात दीपशिखा बाप्पाच्या सेवेत मग्न आहे. (सर्व फोटो- Deepshikha Nagpal Instagram)