घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:51 IST2025-08-28T13:45:35+5:302025-08-28T13:51:44+5:30
Hansika Motwani: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या पती सोहेल खतूरियासोबतचे मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने बुधवारी एकटीनेच गणेश चतुर्थी साजरी केली. त्यामुळे दोघांमधील नात्यातील कुरबुरींबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या पती सोहेल खतूरियासोबतचे मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने बुधवारी एकटीनेच गणेश चतुर्थी साजरी केली. त्यामुळे दोघांमधील नात्यातील कुरबुरींबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सोहेल आणि हंसिका यांच्या विवाहाला ३ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले होते. मात्र दोघांच्या नात्यात फार समन्वय निर्माण झाला नाही. मात्र सोहेल याला घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारली असता त्याने काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी दिसलेल्या दृष्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चा अधिकच सुरू झाल्या आहेत. बुधवारी २७ ऑगस्ट रोजी हंसिका मोटवानी हिच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
मात्र हंसिका मोटवानी एकटीनेच गणेशोत्सव साजरा करताना दिसली. तर तिचा पती यावेळी गायब होता. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी हंसिका पेस्टल ग्रीन रंगाची साडी नेसली होती.
त्यासोबतच तिने नियॉन यलो ब्लाऊज परिधान केला होता. तर केस मोकळे सोडले होते. गळ्यामध्ये हेवी डायमंड हार घातला होता. तसेच हातात तांबड्या बांगड्या घातल्या होत्या.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी हंसिका हिने तिचं संपूर्ण घर रजनीगंधा आणि फुलांनी सजवलं होतं. तसेच केळीच्या पानांनी गणपतीच्या आसनाची आरास केली होती. याशिवाय कमळाची फुलेही लावलेली होती.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी हंसिका हिने तिचं संपूर्ण घर रजनीगंधा आणि फुलांनी सजवलं होतं. तसेच केळीच्या पानांनी गणपतीच्या आसनाची आरास केली होती. याशिवाय कमळाची फुलेही लावलेली होती.
गणपती बाप्पांसोबत आपला फोटो शेअर करत हंसिका हिने लिहिले होते की, ‘’बाप्पा तुम्ही माझ्या घरी आलात, तुमचं स्वागत, गणपती बाप्पा मोरया’’!
दरम्यान, गणेश चतुर्थी दिवशीचे हंसिका हिचे एकटीचे फोटो पाहून फॅन तिला सोहेल कुठे आहे? असं विचारत आहेत.