१२७ कोटीचं विमान ते ९ कोटींची Rolls Royce; राम चरणने खरेदी केलेल्या ६ महागड्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:53 PM2023-06-20T12:53:01+5:302023-06-20T12:56:22+5:30

6 most expensive things owned by RamCharan सुपरस्टार रामचरण ( Ramcharan) याचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःचा ठसा आहे. भारतात सर्वात मानधन घेणाऱ्या आणि श्रीमंत अभिनेत्यांमध्ये रामचरण याचेही नाव आहे.

RRR मधील त्याच्या भूमिकेने सर्वांच्या मनात घर केले आणि याच चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑक्सर पुरस्कारही मिळाला होता. रामचरण आणि पत्नी उपासना (Upasana) यांना आज कन्याप्राप्ती झाली.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर रामचरण-उपासना आई-बाबा झाले आहेत. साऊथ मेगास्टार रामचरण आणि उपासना १४ जून २०१२ रोजी विवाहबंधनात अडकले. सुपरस्टार रामचरण याची कन्या खरी प्रिन्सेस ठरणार आहे. अभिनेत्याचा थाटच शाही आहे.

रामचरणकडे १२७ कोटीचं विमान ते ९ कोटींची Rolls Royce असा सहा महागड्या गोष्टी आहेत, की चाहते अवाक् होतील.

हैदराबाद येथे ३० कोटींचा त्याचा Jubilee Hills नावाच बंगला आहे. Trujet Airlines मध्ये त्याची १२७ कोटींची गुंतवणूक आहे. १ कोटींहून अधिक किंमत असलेले ३० महागडी घड्याळं रामचरणकडे आहेत.

Konidela Production Company चा तो मालक आहे आणि त्याची एकूण किंमत १०० कोटींच्या आसपास आहे.

Apollo Hospitals मध्येही त्याची गुंतवणूक आहे आणि ती जवळपास ७ कोटींच्या आसपास असल्याची माहिती मिळतेय. रामचरणकडे ९.५७ कोटींची Rolls Royce Phantom कार आहे.