फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:43 IST2025-07-29T16:09:46+5:302025-07-29T16:43:21+5:30
फराह खानचा कुक दिलीपच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दल जाणून घ्या...

दिग्दर्शिका फराह खानने (Farah Khan) २०२४ मध्ये मागच्या वर्षी तिचं फराह खान नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. फराह खान या चॅनेलमार्फत अनेक कलाकारांचे कुकिंगचे व्हिडीओज शेअर करीत असते. यादरम्यान कलाकार स्वत: विविध पदार्थ बनविताना दिसतात. यावेळी तिचा कूक दिलीप कायम फराह खानबरोबर प्रत्येक व्हिडीओमध्ये असतो.
विशेष म्हणजे सर्व कलाकार त्याच्याबरोबर मज्जा-मस्ती करीत असतात. तर दिलीपही (Farah Khan’s Cook Dilip) अनेकदा विनोद करताना दिसतो. त्याचा साधा, सरळ स्वभाव अनेकांना भावतो. त्यामुळे आता त्याचाही चाहतावर्ग तयार झाला आहे.
एकेकाळी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका छोट्या गावात शेतात काम करणारा दिलीप आज फराह खानच्या यूट्यूब चॅनलवरील सर्वात लोकप्रिय चेहरा ठरला आहे.
विशेष म्हणजे दिलीप हा शाहरुख खानबरोबर झळकला आहे. दिलीपनं शाहरुख खानबरोबर Myntraसाठी एक जाहिरात शूट केली.
बिहारमधून रोजगाराच्या शोधात मुंबई गाठणाऱ्या दिलीपने सुरुवातीला घरगुती स्वयंपाकी म्हणून अनेक ठिकाणी काम केलं. मात्र मेहनतीमुळे त्याचे नशीब पालटले आणि त्याला फराह खानच्या घरात कामाची संधी मिळाली.
गेल्या तब्बल १० वर्षांपूर्वी दिलीप फराहसाठी काम करतोय. दिलीप मुखिया हे त्याचे पूर्ण नाव आहे.
२००३ मध्ये त्याचे लग्न सविता नावाच्या मुलीशी झाले असून त्यांना तीन अपत्ये आहेत. फराह ही दिलीपला तिच्या कुटुंबाचा भाग मानते.
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, दिलीप सध्या दर महिन्याला १ लाख रुपयांपेक्षा अधिक कमावतो. फराहने आपल्या व्लॉगमध्ये मजेत सांगितलं की, "दिलीपने १ लाख रुपयांची अभिनयाची ऑफर नाकारली, कारण आता त्याच्यासाठी १ लाख ही रक्कम कमी वाटते".
आज दिलीपकडे BMW कार आहे. तो म्हणतो, "आता मला त्यापेक्षाही महागडी कार खरेदी करावी लागेल".
याशिवाय, बिहारमधील आपल्या गावी दिलीपने तीन मजली, सहा खोल्यांचा बंगला उभारला असून त्यामध्ये स्विमिंग पूलही बांधण्यात येणार आहे. सध्या त्याची पत्नी आणि मुले या घरात राहतात. दिलीपसारख्या सामान्य व्यक्तीचं असामान्य यश आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.