everything golden! गौरी नलावडेचं गोल्डन रंगाच्या साडीत हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 19:11 IST2024-01-12T19:07:39+5:302024-01-12T19:11:13+5:30

Gauri nalawade: गौरीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. 'स्वप्नांच्या पलिकडले' या गाजलेल्या मालिकेतू तिने मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केलं.

मालिकेनंतर गौरीने तिचा मोर्चा सिनेमांकडे वळवला. कान्हा, फ्रेंड्स आणि फॅमिली कट्टा या सिनेमात तिने काम केलं.

सूर राहू दे या मालिकेतही तिने वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली होती.

गौरी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अलिकडेच गौरीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गोल्डन आणि ऑफ व्हाइट अशा कॉम्बिनेशनची साडी नेसली आहे.

या साडीवर शोधून दिसेल असा हलकासा मेकअप आणि मोजकेच दागिने तिने परिधान केले आहेत.

गौरीच्या या फोटोंना चाहत्यांकडून लोकप्रियता मिळत आहे.