'या 'भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेमात होती एली अवराम, त्याचं लग्न होताच शेअर केलेली 'ती' पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:57 IST2025-07-17T12:25:13+5:302025-07-17T12:57:28+5:30

कोण आहे तो स्टार क्रिकेटर? सध्या एली अवराम युट्यूबर आशिष चंचलानीला डेट करत असल्याची चर्चा आहे

स्वीडिश अभिनेत्री एली अवराम (Elli Avrram) सध्या चर्चेत आहे. युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानीसोबत तिचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे. आशिषनेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

एली अवराम ३४ वर्षांची असून आशिष ३० वर्षांचा आहे. एलीचं आतापर्यंत अनेकांसोबत नाव जोडलं गेलं आहे. त्यामुळे आता या नवीन अफेअरवरुन तिला ट्रोल केलं जात आहे.

एली अवरामने हिंदी इंडस्ट्रीत काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतीच ती मराठी सिनेमातही दिसली. एलीचं निरागस सौंदर्य कोणीही तिच्या प्रेमात पडेल असंच आहे.

तिच्या याच सौंदर्यावर भारतीय क्रिकेटपटूही क्लीन बोल्ड झाला होता. दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. कोण आहे तो क्रिकेटपटू?

तर हा आहे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. हार्दिक लग्नाआधी एली अवरामसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघंही अनेक इव्हेंट्समध्येही एकत्र दिसले होते.

२०१७ मध्ये कृणाल पांड्या आणि पत्नी पंखुरीच्या रिसेप्शन पार्टीला एली अवरामने हजेरी लावली होती. यावेळी एली आणि हार्दिकने नवदाम्पत्यासोबत स्टेजवर फोटो काढला होता.

एलीने कधीच त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलं नव्हतं. मात्र तिने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

हार्दिकने नताशाशी लग्न केल्यानंतर एलीने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. 'आता तू स्वत:चीच तारणहर्ता हो' असं तिने लिहिलं होतं. एली नंतर बिग बॉस ७ मध्येही दिसली. तेव्हा तर तिच्या आणि सलमान खानच्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.