EX बॉयफ्रेंडवर जादूटोणा केल्याचा संशय! आता ४१ व्या वर्षी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:15 IST2026-03-25T14:07:12+5:302026-03-25T14:15:03+5:30
टेलिव्हिजन विश्वातील एका अभिनेत्रीने ती अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली असा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पहिलं प्रेम तुटल्यावर किती त्रास झाला, हे तिने सांगितलं

टेलिव्हिजन विश्वातील एका अभिनेत्रीने ती अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली असा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पहिलं प्रेम तुटल्यावर किती त्रास झाला, हे तिने सांगितलं

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांकाने राजीव खंडेलवालच्या टॉक शोमध्ये ही गोष्ट सांगितली त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं.

टीव्ही विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आज आपल्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत सुखी आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ती वैयक्तिक आयुष्यात प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरत होती.

अभिनेता शरद मल्होत्रासोबत दिव्या रिलेशनशिपमध्ये होती. तिचे ८ वर्षांचे नाते तुटल्यानंतर दिव्यांका पूर्णपणे कोलमडली होती. इतकंच नव्हे त्या काळात तिच्या मनात अंधश्रद्धेचे विचार आले होते.अभिनेता शरद मल्होत्रासोबत दिव्या रिलेशनशिपमध्ये होती. तिचे ८ वर्षांचे नाते तुटल्यानंतर दिव्यांका पूर्णपणे कोलमडली होती. इतकंच नव्हे त्या काळात तिच्या मनात अंधश्रद्धेचे विचार आले होते.

कोणीतरी बॉयफ्रेंडवर जादूटोणा केलाय, असा दिव्याला संशय होता. अंधश्रद्धेची मदत घेऊन दिल्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडला आयुष्यात पुन्हा परत आणू इच्छित होती. परंतु नंतर दिव्याला चूक उमगली आणि ती या धक्क्यातून सावरली.

या धक्क्यातून सावरत दिव्यांकाच्या आयुष्यात अभिनेता विवेक दहियाची एन्ट्री झाली. २०१६ मध्ये या जोडीने भोपाळमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.

आता दिव्यांका आणि विवेक लग्नाच्या १० वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. दोघेही आयुष्यात नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत

















