PICS : कोरिओग्राफर तुषार कालियानं केला साखरपुडा, शेअर केले रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 17:14 IST2022-05-16T17:05:51+5:302022-05-16T17:14:55+5:30
Choreographer Tushar Kalia gets engaged : ‘डान्स दीवाने’ या शोचा जज आणि कोरिओग्राफर तुषार कालिया लवकरच ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये दिसणार आहे. त्याआधी तुषारने एक गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘डान्स दीवाने’ या शोचा जज आणि कोरिओग्राफर तुषार कालिया लवकरच ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये दिसणार आहे. त्याआधी तुषारने एक गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
होय, तुषारने गर्लफ्रेन्ड त्रिवेणी बर्मनसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय तुषारने त्रिवेणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
यावर्षीच्या सुरूवातीला तुषारने त्रिवेणीसोबतचं रिलेशनशिप ऑफिशिअल केलं होतं. गत रविवारी तुषार व त्रिवेणीचा साखरपुडा पार पडला. नवी सुरूवात, असं कॅप्शन देत तुषारने त्याच्या लेडी लव्हसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
फोटोत तुषार व त्रिवेणी दोघंही व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. दोघांनीही रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत. फोटोत दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसते.
तुषारची होणारी पत्नी त्रिवेणी एक मॉडेल आहे. त्रिवेणीने 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताब जिंकला होता.
त्रिवेणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत.
तर तुषार एक लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी त्याने कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे.
ए दिल है मुश्किल, ओके जानू, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांतील गाणी त्याने कोरिओग्राफ केली. डान्स दीवाने व इंडियाज गॉट टॅलेंज सारखे शो त्याने जज केले आहेत.